व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, November 30, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राष्ट्रपतींनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले…

India Darpan by India Darpan
November 7, 2023 | 5:24 pm
in संमिश्र वार्ता
0

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सोमवारी (दि. ६) नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना दिले. या निमंत्रणाचा तात्काळ स्वीकार राष्ट्रपतींनी केला असून या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेला २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९१९ च्या भारतीय कायद्यानुसार १९२१ मध्ये भारतातील पहिली विधान परिषद मुंबई प्रांतात स्थापन झाली. २०२१ मध्ये कोरोना सारखा गंभीर आजार असल्याने या शतकमहोत्सवी वर्षात कोणताही कार्यक्रम आयोजित करता आला नाही. त्यामुळे यावर्षी विधान परिषदेचा शतक महोत्सव साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना देण्यात आले, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या शतक महोत्सवी कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वा विधान परिषदेच्या जुन्या सदस्यांसाठी व नवीन सदस्यांसाठी एक दिवसाची पूर्व तयारीची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रसाद लोढा उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला जवळपास १०० माजी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच विधानपरिषदेतील कामकाजासंदर्भात विविध विषयावर ५ पुस्तके करण्यात येणार आहेत. यासाठी विधान परिषदमध्ये अनेक वर्षे काम करणाऱ्या जेष्ठ पत्रकारांच्या ५ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.


Previous Post

नाशिकला सरकारी, निमसरकारी,शिक्षकसह या कर्मचा-यांचा कुटुंबियांसह बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Next Post

२२ घरफोड्या करणा-या दरोडेखोराला पकडण्यासाठी पोलिस बनले वीट कामगार!… अशी केली कारवाई

Next Post

२२ घरफोड्या करणा-या दरोडेखोराला पकडण्यासाठी पोलिस बनले वीट कामगार!… अशी केली कारवाई

ताज्या बातम्या

सरकारमध्ये सहभागी झालो असलो तरी..अजित पवार यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

November 30, 2023

प्रसूतीपूर्व लिंग निदान केल्यास या टोल फ्री नंबरवर करा तक्रार…. असे मिळणार तक्रारदाराला १ लाख रुपयाचे बक्षीस

November 30, 2023

पाच राज्याचे एक्झिट पोल आले समोर… भाजपला धक्का, काँग्रेसला तीन राज्यात संधी

November 30, 2023

अन्न औषध प्रशासनाची विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त, २२२ आरोपींना अटक

November 30, 2023

येवला व निफाड तालुक्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

November 30, 2023

सॅम बहादूर चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा….विकी कौशल, फातिमा शेखचा कसदार अभिनय ( बघा व्हिडिओ)

November 30, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.