इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे हॅक झालेले व्हॉट्सॲप सुरु झाले आहे. दरम्यान हॅकरने तब्बल ४०० डॅालरची मागणी केल्याची चर्चा आहे. पुणे ग्रामीण पोलिस याचा तपास करत आहे. मोबाईल कसा हॅक झाला, तो कोणी व का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान सुळे यांनी दुसरे ट्विट करत म्हटले आहे की, माझे व्हॉट्सॲप सुरू झाले आहे. व्हॉट्सॲप टीमने यासाठी अतिशय मोलाचे सहकार्य केले. याबद्दल टिम व्हॉट्सॲप व पुणे ग्रामीण पोलीसांचे मनापासून आभार. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व… यावेळी त्यांनी नागरीकांना माझी विनंती आहे की, आवश्यक ती सर्व काळजी घेऊनही माझे व्हॉट्सॲप हॅक झाले होते. कृपया आपण सर्वजण डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घ्या. व्हॉट्सॲप वापरताना टू फॅक्टर व्हेरीफिकेशन करुन घ्या. आपले पासवर्ड, ओटीपी कुणालाही देऊ नये. तसेच अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या लिंक क्लिक करु नये. डिजिटल सुरक्षा हि अतिशय महत्त्वाची बाब असून आपण आवश्यक ती काळजी घ्यावी.
काल हॅक झाला होता फोन
रविवारी दुपारी १ वाजता सुप्रिया सुळे यांना ट्विट करत म्हटले होते की, माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी असे म्हटले होते.
हॅक होण्याचे प्रमाण वाढले
फोन व व्हॅाटसअप हॅक होणे ही गंभीर बाब असून तपासानंतर त्यामागचे कारण पुढे येणार आहे. गेल्या काही दिवसात हॅक होण्याचे प्रमाण वाढले असून त्यातून तांत्रीक गोष्टीमधील उणीवा समोर येत आहे.