इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आगीत बेचिराक झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकार २० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज रात्री त्यांनी नाट्यगृहाची पाहणी केली.
यावेळी ते म्हणाले की, जसे होते तसेच नाट्यगृहाची पुनर्बांधणी करणार. दोन दिवसापूर्वी या नाट्यगृहाला मोठी लाग लागल्यानंतर या नाट्यगृहाची पाहणी करत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.