नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेडिकल स्टोअर्स मधून चॉकलेट खरेदीचा बहाणा करीत भामट्यांनी महिलेच्या गळयातील मंगळसूत्र ओरबाडून नेले. ही घटना गोविंदनगर भागात घडली या घटनेत ९० हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली सतिष अमृतकार (रा.गोविंदनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे, अमृतकार यांचे गोविंदनगर येथील प्रकाश पेट्रोल पंप परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. शुक्रवारी (दि.९) रात्री त्या आपल्या दुकानात व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली.
दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने चॉकलेट व व्हेपर्स खरेदीचा बहाणा करीत त्यांच्या गळयातील ९० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून दोघांनी न्यु इरा स्कूलच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक गाडे करीत आहेत.