व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Thursday, November 30, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान जाळपोळ घटनेची भुजबळांनी केली पाहणी.. शरद पवार कार्यालयातही गेले

India Darpan by India Darpan
November 6, 2023 | 1:37 pm
in स्थानिक बातम्या
0


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आज बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी आज बीड जिल्ह्यात आ.प्रकाश सोलंकी,जयदत्त क्षिरसागर, आ.संदिप क्षिरसागर, माजी आमदार अमरसिंग पंडित, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ऍड सुभाष राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता हॉटेल ‘रामा इंटरनॅशनल’ छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकारांशी ते संवाद साधणार आहे.

बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या संपर्क कार्यालयात तोडफोड करत संपूर्ण घर व कार्यालय पेटवून देण्यात आले होते. आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी व कार्यालयाची पाहणी केली. तसेच क्षीरसागर कुटुंबीयांची भेट घेतली.

बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) कार्यालय पेटविण्यात आले होते. आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या कार्यालयाची पाहणी केली.

११ कोटी रुपयांचे नुकसान
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बीड जिल्हयात हिंसक वळण लागले होते. आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर व अन्य नेत्यांच्या मालमत्ता जाळण्यात आल्या. माजलगाव नगरपालिकेचे कार्यालय जाळण्यात आले. बीड शहरातील बसस्थानकावर उभ्या असलेल्या अनेक बसची तोडफोड करण्यात आली. या सर्वच घटनेत सुमारे ११ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पोलिसांनी १४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व घटनेनंतर येथील तणाव आता निवळला आहे.


Previous Post

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा अंतीम निकाल….बघा कोणत्या पक्षाला मिळाल्या, किती जागा

Next Post

पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या फेक बोल्ड व्हायरल व्हिडिओने खळबळ…या अभिनेत्याने केले तीन ट्विट (बघा व्हिडिओ)

Next Post

पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या फेक बोल्ड व्हायरल व्हिडिओने खळबळ…या अभिनेत्याने केले तीन ट्विट (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

अन्न औषध प्रशासनाची विशेष मोहीम; २९ लाख ६६ हजार रूपयांचा साठा जप्त, २२२ आरोपींना अटक

November 30, 2023

येवला व निफाड तालुक्यातील अवकाळीने झालेल्या नुकसानीची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी..

November 30, 2023

सॅम बहादूर चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चा….विकी कौशल, फातिमा शेखचा कसदार अभिनय ( बघा व्हिडिओ)

November 30, 2023

भरधाव दुचाकी घसरल्याने ४५ वर्षीय चालकाचा मृत्यू

November 30, 2023

या स्वायत्त महाविद्यालयांवर कारवाई होणार.. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद बैठकीत निर्णय

November 30, 2023

राष्ट्रवादीत बंड करण्याचे कारणच सुनील तटकरेंनी सांगत केला गौप्यस्फोट

November 30, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.