इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन मुंबईत बैठक झाली होती. त्याअनुषंगाने बैठकीत सुचवलेला खड्डे बुजवण्याचा पर्याय आणि त्यांच्या अंमलबजावणीची स्वतः दौरा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.
यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे वाहतूक पोलीस तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.