इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी झालेल्या मतदानाचे निकाल आता समोर येऊ लागले असून आतापर्यंत आलेल्या निकालात भाजपचे वर्चस्व समोर आले आहे. तर दुस-या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या अजित पवारांचा आहे. त्यानंतर शिंदे गट तिस-या क्रमांकावर आहे. महाआघाडीच्या तीन्ही पक्षांचा त्यानंतर नंबर आहे.
या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन भाजप भाजप -७१७, राष्ट्रवादी अजित दादा गट ३८२. शिवसेना शिंदे गट -२७३ काँग्रेस -२९३, राष्ट्रवादी शरद पवार -२०५, शिवसेना ठाकरे गट -१४० तर इतर ३४९ जागा मिळाल्या आहे. महायुती व महाविकास आघाडीने सर्वच निवडणुका एकत्रीत लढवल्या नसल्या तरी सत्ताधारी महायुतीचा आकडा हा १३७२ तर महाविकास आघाडीचा एकत्रीत आकडा ६३८ पर्यंत आतापर्यंत गेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत तब्बल ७३४ जागा महायुतीने जास्त जिंकल्याचे समोर येत आहे.
राष्ट्रवादी व शिवसेनामध्ये झालेल्या या फुटाचा फटका या निवडणुकीत बघायला मिळतो आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाचा आकडा एकत्र केला तर त्यांना ४१३ जागा मिळाल्या आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना ५८७ जागा मिळाल्या आहे.