नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने आणि मित्र विहार संस्था, यशवंत व्यायाम शाळा यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र ज्यूदो असोसि एशन च्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या मिनाताई ठाकरे विभागी क्रीडा संकुल येथे ३ ऱ्या राज्यस्तरिया चॅम्पियन लीग स्पर्धेचे आयोजन दिनांक करण्यात आले आहे. ज्यूदो ह खेळ वैयक्तिक असला तरीही खेळाडूंमध्ये संघभावना निर्माण व्हावी यासाठी गेल्या तीन वर्षापासून नाशिक ज्यूदो असोसिएशनने या स्पर्धेला सांघिक स्वरूप दिले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करून क्रिकेट आय.पी.एल. प्रमाणे आठ संघ तयार करण्यात आले आहेत.
यामध्ये रायगड चालेंजर्स, शिवनेरी किंग्ज, तोरण टायगर्स, अंकाई अट्याकर्स, तुंग ट्राइब, पावन पन्हाळा, लोहगड लिजेटस्न, आणि देवगिरि स्टार स्टायकर्स या आठ संघांचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असतील त्यामध्ये सहा पुरुष आणि सहा महिला खेळाडूंचा समावेश असेल. यामध्ये १५ ते १८ वर्षे हा कॅडेट गट, १५ ते २१ हा ज्यूनीयर गट आणि १५ वर्षा पुढील खुला गट असे गट असतील. पुरुषांसाठी वजनाची अट ५० किलो, ६० किली आणि ७३ किलोवरील वजन गट असणार आहेत तर महिलांसाठी ४४ किलो, ५२ किलो आणि ६३ किलोवरील गट असे तीन गट असणार आहेत. या स्पर्धेत सर्व संघामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा समावेश असणार आहे.
रोख पारितोषिके : विजेत्या संघांना रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या संघाला रु. एक लाख एकतीस हजार, द्वितीय संघाला रु. एक लाख आणि तृतीय संघाला रु. एकाहत्तर रुपये देण्यात येणार आहेत. तर विजयी संघांना आमदार राहुल ढीकले चषक. उपविजयी संघाला राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक विजय पाटील यांच्या वतीने विजय पाटील चषक आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला राष्ट्रीय खेळाडू तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पोलिस निरिक्षक तुषार माळोदे यांच्यातर्फे आकर्षक चषक प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेला नाशिकचे पूर्वचे आमदार राहुल ढीकले, मित्र विहार क्लब, यशवंत व्यायाम शाळा आणि नाशिक जिल्हा ज्यूदो असोसिएशन यांचे प्रयोजकत्व लाभले आहे. ॉउद्या दिनांक १० एप्रिल रोजी स्पर्धा सकाळी नऊ वाजेपासून सुरू राहणार आहेत. तर औपचारिक उद्घाटन सकाळी ११.०० वाजता करण्यात येणार आहे.
आज पत्रकार परिषदमध्ये जेष्ठ क्रीडा संघाटक रत्नाकर पटवर्धन यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. ज्यूदो हा खेळ वैयक्तिक आहे. परंतु खेळाडूंमध्ये सांघिक भावना जोपासली जावी यासाठी या सांघिक प्रकारच्या चॅम्पियन लीगची सुरवात तीन वर्षापूर्वी भारतात प्रथम नाशिक जिल्ह्याने सुरू केली आहे. हा यशस्वी प्रयोग सर्वांना आवडला असून आता भारतात अश्या लीग स्पर्धाचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी या स्पर्धेचे तांत्रिक प्रमुख पुणेचे सुधीर कोंडे, चरतापटी पुरस्कार प्राप्त तुषार माळोदे, आनंद खरे, ज्यूदो प्रशिक्षक तथा स्पर्धा आयोजन प्रमुख योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे सुहास मैद, रवींद्र मेतकर. माधव भट आदी उपस्थित होते.