गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लासलगावला लाडकी बहीण संवाद मेळावा..

by India Darpan
ऑगस्ट 9, 2024 | 5:27 pm
in इतर
0
IMG 20240809 WA0195


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचा साडे सहा लाख कोटी रुपयांचा अर्थ संकल्प आपण मांडतो. यातून महिलांना सबळ, सक्षम बनविण्यासाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून ४५ हजार कोटी रुपये महिलांच्या योजनेसाठी बाजूला ठेवणं हे सहज शक्य आहे आणि आपण महायुती सरकारने ते केलं आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. तर महायुती सरकारच्या वतीने राज्यातील जनतेच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या विकासाच्या योजना या अविरत सुरू राहतील. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू,आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विकासाला साथ द्या असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात लाडकी बहीण संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधूने, माजी जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती गणेश डोमाडे, सरपंच सचिन दरेकर, अफजल शेख, दत्तुपंत डुकरे, डॉ. श्रीकांत आवारे, रमेश पालवे, दत्ता रायते, सुवर्णा जगताप, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, मंगेश गवळी, शेखर होळकर, कैलास सोनवणे, भिमराज काळे, मधुकर गायकर, रामनाथ शेजवळ, विलास गोरे, सचिन जगताप, सुरेखा नागरे, अशोक नागरे, उत्तम नागरे, बाळासाहेब रायते, बबन शिंदे, सचिन कळमकर, लतिफ तांबोळी, अमोल थोरे,समाधान जेजुरकर, संतोष राजोळे, संजय घायाळ, सोहेल मोमीन,राहुल डुंबरे,गणेश निकम, राजाभाऊ चाफेकर, निलेश सालकाडे, चेतन कासव, पांडुरंग राऊत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, महायुती सरकारच्या योजनांचा लाभ मिळून महिला सबळ, सक्षम व्हाव्यात यासाठी आपला प्रयत्न आहे. जनतेची शक्ती अनेक दिवसापासून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचं पाठबळ मिळविण्यासाठी आम्ही जन सन्मान यात्रा सुरू करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, महिलांना लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचे पैसे देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांची फाईल माझ्या समोर आली. त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आपण त्यावर आपण तात्काळ सही केली. काही लोक सांगत असतील ही योजना पुढे चालणार नाही. मी सर्वांना सांगतो की महायुतीचे सरकारमध्ये ही योजना पुढील पाच वर्ष सुरू ठवण्यात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.

ते म्हणाले की, सर्व जाती धर्मांना न्याय देण्याचे काम आम्ही करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कुठलाही भेदभाव होणार नाही. राज्यातील सर्व समाजाला सक्षम करण्यासाठी विविध महामंडळाची व संस्थांची निर्मिती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, कांदा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात बंदी करू नये असा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शेतकरी बांधवांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाला ५ रुपये अनुदान आपण जाहीर केलं आहे. या योजनांचा फायदा जनतेला होण्यासाठी आपला प्रयत्न आहे.

ते म्हणाले की, नाशिकला पिण्याच्या पाण्यासाठी किकवी प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊन लवकरच किकवी धरणाची उभारणी केली जाईल. आचारसंहिता लगायाच्या आत नार पार ही महत्वपूर्ण योजना मंजूर करण्यात येणार तसेच पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी आपले प्रयत्न आहे. यासाठी हजार कोटी रुपयांची योजना आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी आणून हे प्रकल्प आम्ही मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जन सन्मान यात्रेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून केली त्याबद्दल अजितदादा पवार यांचे आभार मानत ते म्हणाले की, महायुती सरकारने महिला, शेतकरी, युवक, विद्यार्थिनी यांच्यासह विविध घटकांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहे. त्या योजना राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या यात्रेच्या माध्यमातून होत आहे. महिलांना दरमहा १५०० रुपये, मुलींना मोफत शिक्षण, युवकांना स्टाय पेंड, शेतकऱ्यांना मोफत वीज, महिलांना वर्षभरात मोफत तीन गॅस सिलेंडर या सुरू करण्यात आलेल्या योजना १०० टक्के अविरत सुरू राहतील. महायुती सरकारने दिलेली वचने पूर्ण करण्यात येतील.

ते म्हणाले की, पिंपळस ते येवला या ५६० कोटी रुपयांच्या काँक्रीटीकरण रस्त्याचे १० दिवसात काम सुरू करण्यात येणार आहे. तसेच विंचूर ते लासलगाव रस्त्याचे चौपदरकरण करण्यासाठी १३४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ते काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. लासलगाव बाह्य वळण योजनेसाठी ११० कोटी रुपये, लासलगाव उपजिल्हा रुग्णालयास १४ कोटी, लासलगाव विंचूर सह १६ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. येवल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येणार आहे. मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्यासाठी पावणेतीनशे कोटी रुपये खर्च करून अस्तरीकरण करण्यात येत आहे. या सर्व योजना या जनतेसाठी कुठल्याही जाती धर्मासाठी नाही. विकास हाच आमचा ध्यास,श्वास आहे.महायुती सरकार राज्याच्या विकासासाठी कटिबध्द आहोत.या विकासाच्या पाठीशी सर्वांनी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. विकास हा सर्वांसाठी आहे. त्यामुळे फुले,शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विकासाला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी डॉ. वैशाली पवार, ऐश्वर्या जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेच्या प्रारंभी महापुरुषांच्या पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांदीची राखी भेट देऊन या योजनेबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मालेगावमध्ये आदिवासी दिनाच्या मिरवणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांनी डीजेवर धरला ठेका..(बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिकमध्ये ३ ऱ्या राज्यस्तरीय जुदो लीग स्पर्धेचे आयोजन…आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूं होणार सहभागी

Next Post
Untitled 27

नाशिकमध्ये ३ ऱ्या राज्यस्तरीय जुदो लीग स्पर्धेचे आयोजन…आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूं होणार सहभागी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011