बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने बांधणार..काल आगीत जळून झाले होते बेचिराख

by India Darpan
ऑगस्ट 9, 2024 | 3:26 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2024 08 09 at 11.08.54 AM 1 2048x1365 1

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, अशी ग्वाही देत दोन दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हे वैभव पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने आणि दिमाखात उभारण्यासाठी जास्तीत- जास्त निधी मिळवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करु, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरात बांधलेले केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे सांस्कृतिक वैभवच. सन १९१२ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी हे पॅलेस थिएटर उभारले होते. गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा या नाट्यगृहाला भीषण आग लागली. या आगीत बहुतांशी नाट्यगृह जळून बेचिराख झाले. आज शुक्रवार दि. ९ रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईहून महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कोल्हापुरला आल्यावर रेल्वे स्टेशनवरुन थेट नाट्यगृह गाठले. जळून भस्मसात झालेल्या नाट्यगृहाची व खासबाग मैदान परिसराची त्यांनी पाहणी केली. भीषण आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या बेचिराराख नाट्यगृहाची भग्न परिस्थिती पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ भावुक झाले.

या नाट्यगृहाची पाहणी करताना पालकमंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, आगीच्या भक्षस्थानी सापडलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा फार मोठा ठेवा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोम देशात गेल्यानंतर तिथले नाट्यगृह पाहून इथल्या स्थानिक नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी हे नाट्यगृह बांधले होते. ते आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी, मन सुन्न करणारी बाब आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कोल्हापूरला येताना रेल्वे प्रवासात रात्री उशिरा ही घटना मला सोशल मीडियावर समजली. आगीची ती दृश्ये मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदना देणारी होती. नाट्य कलाकारांना प्रोत्साहन, चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी उभारलेले हे सांस्कृतिक वैभव पुन्हा उभे करणे किंबहुना याच्यापेक्षा अधिक चांगले, अद्ययावत पद्धतीने निर्माण करणे ही आम्हा सर्व लोकप्रतिनिधी आणि शासनाची जबाबदारी आहे, यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील, तसेच या ऐतिहासिक वास्तूला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त डॉ .के. मंजूलक्ष्मी, माजी नगरसेवक आदिल फरास यांसह अधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डी मार्ट मॉल मध्ये डॉक्टर महिलेची पर्स चोरीला…अवघ्या काही तासात चोर गजाआड

Next Post

संतप्त दीराने भावजयीचे घर पेटवून दिले…सेवाकुंज मार्गावरील घटना

India Darpan

Next Post
fire11 e1705415050443

संतप्त दीराने भावजयीचे घर पेटवून दिले…सेवाकुंज मार्गावरील घटना

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011