नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निलगीरीबाग भागातील म्हाडा वसाहतीत राहणा-या ४७ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेंद्र दत्तात्रेय पालखेडे (रा.म्हाडा वसाहत,निलगिरीबाग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पालखेडे यांनी सोमवारी (दि.५) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता.
ही बाब निदर्शनास येताच मुलगा रोहित पालखेडे यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.