नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारने ऑगस्ट, २०१४ मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) नामक राष्ट्रीय वित्तीय समावेशन अभियानाची (एनएमएफआय) सुरुवात केली. बँकेत खाती नसलेल्याना बँक सुविधा देणे, असुरक्षितांना सुरक्षित करणे, निधी न मिळालेल्यांना निधी उपलब्ध करून देणे आणि सेवा न मिळालेल्या किंवा कमी सेवा मिळालेल्या क्षेत्रांना सेवा पुरवणे या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित सार्वत्रिक बँकिंग सेवा, बँक खाती नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रदान करणे या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
बँकेत खाती नसलेल्या प्रौढ व्यक्तींना बँकिंग सुविधा पुरवणे हे १४ ऑगस्ट २०१८ पासून पीएमजेडीवाय चे ध्येय असल्याचे मंत्र्यांनी नमूद केले.
प्रधानमंत्री जन धन योजना संपूर्ण देशात आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी बँकिंग सुविधा वाढविण्यात यशस्वी ठरली आहे याकडेही मंत्र्यांनी लक्ष वेधले. प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत 19.07.2024 पर्यंत 52.81 कोटी पीएम जन-धन खाती उघडण्यात आली त्यात 2,30,792 कोटी रुपये रक्कम जमा आहे. या खात्यांपैकी 29.37 कोटी (55.6%) जन-धन खाती महिलांची आहेत आणि सुमारे 35.15 कोटी (66.6%) पीएमजेडीवाय खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत.