नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुकानाबाहेर काढल्याने चार जणांच्या टोळक्याने तोडफोड करीत मोबाईल दुकानदारास मारहाण केल्याची घटना खडकाळी भागात घडली. याघटनेत दगड मारल्याने दुकानदार जखमी झाला असून त्याच्या दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज,गुलाम उर्फ अदनान शेख,मोसीन व अझर पठाण अशी दुकानदारास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत दानिश इस्माईल शेख (रा.विजय रॉयल अपा.खेडेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांचे खडकाळी भागातील रसुलबाग कब्रस्थान येथे एस. एस. मोबाईल नावाचे दुकान आहे. संशयित अरबाज हा गुरूवारी (दि.१) सायंकाळी शेख यांच्या दुकानात गेला होता.
त्यावेळी तो उपस्थित ग्राहकांशी उध्दटपणे बोलला. त्यामुळे शेख यांनी त्यास दुकानाबाहेर काढल्याने ही घटना घडली. संशयिताने अन्य साथीदारांना सोबत आणत दुकानात शिरून शेख यांना मारहाण केली. या वादात दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आल्याने मोठे नुकसान झाले असून शेख यांना दगड फेकुण मारल्याने ते जखमी झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.