नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव दुचाकी घसरल्याने जानोरी ता.दिंडोरी येथील ४० वर्षीय चालक ठार झाला. हा अपघात जानोरी ते मखमलाबाद मार्गावर झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवशा भागिरथ डंबाळे (रा.बानगडवाडी जानोरी ता.दिंडोरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. डंबाळे बुधवारी (दि.३१) सायंकाळी जानोरी येथून मखमलाबाद येथे जाण्यासाठी आपल्या दुचाकीवर निघाला होता. म्हसरूळ मार्गे प्रवास करीत असतांना साईबाबा मंदिर परिसरात भरधाव दुचाकी घसरली.
या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने पत्नी अलका डंबाळे यानी त्यास बिरसा मुंडा हॉस्पिटल मार्फत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जगताप करीत आहेत.