नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील सुभाषरोड भागात असलेले गोडावून फोडून चोरट्यांनी सुमारे साडे सहा लाख रूपये किमतीचा तंबाखू आणि सिगारेटचा साठा चोरून नेला. या धाडसी घरफोडीने व्यापारीवर्गात खळबळ उडाली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनय खेमचंद तारवाणी (रा.गंधर्वनगरी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. तारवाणी यांचा सुभाषरोडवर तंबाखू विडी सिगारेट विक्रीचा व्यवसाय आहे. गुप्ताचाळ मध्ये परमानंद किशनचंद विडी सिगारेट जनरल स्टोअर्स नावाचे दुकान असून देशमुख भवन येथे दुकानाचे गोडावून आहे. बुधवारी (दि. ३१) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोडावूनच्या कुलूप लावलेल्या पट्या तोडून ही चोरी केली.
गोडावून मध्ये शिरलेल्या चोरट्यांनी रॅकवर ठेललेले सुमारे सिगारेटचे बॉक्स आणि तंबाखू पुडे असा सुमारे सहा लाख ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.