इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाच्या पदभरतीतही असाच प्रकार झाल्याची शक्यता आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या पदांमधील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका आहे. दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेले नऊ अधिकारी चौकशीच्या रडारवर आहेत. या नऊ जणांची दोन दिवस नव्याने शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे.
२०२२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या दहापैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात असून त्यांची शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने लोकसेवा आयोगाला दिले आहेत. या सर्व उमेदवारांच्या नव्याने शारीरिक चाचण्या होण्याची शक्यता आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा ६२३ पदांसाठी झाली होती. यातील १० जागा दिव्यांगांसाठी राखीव होत्या.