रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कोचिंग हा सध्या नफेखोरीचा उद्योग झाला आहे – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

by India Darpan
जुलै 29, 2024 | 11:59 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 106


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्ली येथील कोचिंग सेंटरमध्ये पावसाचे पाणी भरल्याने युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुःखद मृत्यूसंदर्भात आज राज्यसभेत नियम १७६ अंतर्गत अल्पकालीन चर्चा करण्यात आली. या चर्चेला परवानगी देताना राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले, “देशातील युवा लोकसंख्याविषयक लाभांशाची जोपासना व्हायला हवी असे माझे मत आहे. मात्र मला असे दिसून आले आहे की कोचिंग हा एक प्रकारे व्यवसायच झाला आहे.”

वर्तमानपत्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर कोचिंग सेंटर्सतर्फे अव्वाच्या सव्वा खर्च केला जातो त्याबाबत चिंता व्यक्त करून, हा पैसा विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या गलेलठ्ठ शुल्कातूनच केला जातो असे मत उपराष्ट्रपती धनखड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “कोचिंग हा सध्या नफेखोरीचा उद्योग झाला आहे.प्रत्येक वेळी वर्तमानपत्र वाचताना आपल्याला पहिली एक-दोन पाने अशा सेंटरच्या जाहिरातींनी भरलेली दिसतात. अशा जाहिरातींसाठी खर्च होणारा प्रत्येक रुपया विद्यार्थ्यांकडूनच घेतलेला असतो, या सेंटर्सची प्रत्येक नवी इमारत विद्यार्थ्यांच्या पैशातूनच उभी राहते,” ते पुढे म्हणाले.

कोचिंग संस्कृतीमुळे देशात निर्माण झालेल्या भूमिगत खड्डासदृश परिस्थितीची तुलना ‘गॅस चेंबर्स’शी करत अध्यक्ष म्हणाले, “अधिकाधिक प्रमाणात संधी उपलब्ध होऊ लागलेल्या आपल्यासारख्या देशात ही समस्या निर्माण करत आहेत.ही सेंटर्स ‘गॅस चेंबर्स’प्रमाणेच श्वास कोंडणारी आहेत…” राज्यसभेत उपस्थित सदस्यांनी देशात उपलब्ध असणाऱ्या इतर विविध प्रकारच्या रोजगाराबद्दल तसेच कौशल्यविषयक संधींबद्दल आपल्या देशातील युवकांना जागरुक करावे अशी सूचना याप्रसंगी धनखड यांनी केली.

जेव्हा काही पक्षाच्या सभागृह नेत्यांना चर्चेसाठी तसेच सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालण्याची सुनिश्चिती करण्यासंदर्भात सूचना करण्यासाठी सभापती दालनात बोलावले जाते तेव्हा स्वीकारल्या जाणाऱ्या बहिष्कार तसेच नकारासारख्या चुकीच्या पद्धतींबाबत दुःख व्यक्त करत उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “मला होणारा मनस्ताप, माझ्या वेदना मला व्यक्त करायच्या आहेत. या सभागृहाचे सभापती जेव्हा माननीय सभासदांना चर्चेसाठी दालनात येण्याची विनंती करतात, तेव्हा मिळणारा नकार अभूतपूर्व पद्धतीने चुकीचाच नव्हे तर तो संसदीय मर्यादांची पायमल्ली करणारा आहे. सभागृह नेते सदनात सभापतींवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न करतात ही नक्कीच निरोगी पद्धत नव्हे.”

आज सकाळच्या वेळात, सुधांशू त्रिवेदी आणि स्वाती मालीवाल यांच्यासह काही राज्यसभा सदस्यांनी युपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये झालेल्या मृत्यूसंदर्भात नियम २६७ अन्वये चर्चा करण्याची मागणी करणारी नोटीस दिली.संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी या विषयाची तातडी लक्षात घेत नियम २६७ अंतर्गत चर्चा करण्याची तयारी दाखवली मात्र सभागृहातील विरोधी पक्षांचे नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर विरोधी पक्षांनी नियम २६७ अंतर्गत चर्चा करण्याचे अमान्य केले. जर सभागृहातील प्रमुख राजकीय पक्षांना मान्य असेल तसेच सभागृहाने संमती दिली असेल तरच नियम २६७ अंतर्गत एखाद्या विषयावर चर्चा करता येते असे अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले आणि सभापतींनी नियम १७६ अंतर्गत अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंदिरातील दान पेटीतून चोरट्यांनी २५ हजाराच्या रोकडवर मारला डल्ला…सिडकोतील घटना

Next Post

राज्यातील नऊ अधिकारी चौकशीच्या रडारवर…दिव्यांगत्वाची नव्याने शारीरिक चाचणी होणार

Next Post
mpsc 1 e1705601560979

राज्यातील नऊ अधिकारी चौकशीच्या रडारवर…दिव्यांगत्वाची नव्याने शारीरिक चाचणी होणार

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011