नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील महाजननगर भागात मंदिरातील दान पेटीतून चोरट्यांनी रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत दोन दानपेटीमधील सुमारे २५ हजाराच्या रोकडवर डल्ला मारण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप वेडू वाघ (रा.ग्रिन पार्क रो हाऊस जयहिंद कॉलनी,अतुल डेअरी समोर महाजन नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना जयहिंद कॉलनीतील महालक्ष्मी देवी मंदिरात घडली. शुक्रवारी (दि.२६) रात्री अज्ञात चोरट्यांनी मदिरातील दोन दानपेट्या फोडून सुमारे २५ हजाराची रोकड चोरून नेली. ही बाब दुस-या दिवशी उघडकीस आली. अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
६५ वर्षीय वृध्दाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील पवननगर भागात राहणा-या ६५ वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शामराव बाबुराव वाघमारे (रा.राजरत्ननगर,पवननगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. वाघमारे यांनी रविवारी (दि.२८) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील दुसºया मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा निखील वाघमारे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.