मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई विमानतळावर २० किलो सोने, गांजा आणि विदेशी चलन केले जप्त

by Gautam Sancheti
जुलै 28, 2024 | 11:37 pm
in संमिश्र वार्ता
0
customs4SXLA

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन-III ने 13.11 कोटी रूपये किमतीचे 20.18 किलोपेक्षा जास्त सोने, 4.98 किलो गांजा (मारिजुआना) आणि 96 लाख रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केले आहे. 15-27 जुलै 2024 दरम्यान 39 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मेणातील सोन्याची धूळ, अंतिम हात न फिरवलेले दागिने आणि सोन्याचे बार अशा विविध स्वरूपातील सोने पुठ्ठ्याचे बॉक्स, कागदांचे गठ्ठे, बुटांचे सोल यात लपवलेले आढळले. अशा पद्धतीने शरीरात सोने लपवलेल्या सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीच्या वसंत विहार येथील रहिवासी असलेल्या एका भारतीयाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या चेक-इन बॅगेजमध्ये प्लास्टिकच्या 14 एकसमान पारदर्शक पाकिटात गांजासदृश (मारिजुआना) हिरवट रंगाचा पदार्थ तीन लहान कार्डबोर्ड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला आढळून आला. हा पदार्थाचे वजन 4977 ग्रॅम होते. दुबईहून 2, जेद्दाहहून, शारजाह, कोलकाता आणि अहमदाबादमधून आलेल्या प्रत्येकी एक अशा सहा भारतीय नागरिकांकडे 24 कॅरट सोन्याची धूळ, 24 कॅरट गोल्ड बार आणि 24 कॅरट सोन्याची तार रोडियम आढळून आली. त्यांचे एकूण वजन 7160 ग्रॅम होते. वायरमधील सामानाभोवती, एलईडी ड्रायव्हर्सच्या प्लास्टिक केसेसमध्ये आणि शरीरात ते लपवून ठेवले होते. या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

याशिवाय, दुबई (03) आणि कोलंबो (01) येथून आलेल्या चार परदेशी नागरिकांना रोखण्यात आले आणि त्यांच्याजवळ विजारी (पॅन्ट)च्या खिशात, तसेच सामानवाहू हातगाड्यांमध्ये (ट्रॉली) लपवून ठेवलेली एकूण 1197.00 ग्रॅम वजनाची 24 कॅरट सोन्याची पूड आणि सोन्याच्या लडी, असा ऐवज सापडला.

दुबई (12), बहरीन (02), दोहा (02), हाँगकाँग (01), शारजा (01), सिंगापूर (01), बँकॉक (01), अबू धाबी (01) आणि जेद्दाह (01) येथून आलेल्या 22 भारतीय नागरिकांना रोखण्यात आले. त्यांच्यापाशी, 7685.00 ग्रॅम सोने आणि 30 आय-फोन असा एकूण 44,92,300 रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. हा माल चप्पलच्या तळव्याच्या आत, कागदाच्या दोन थरांमध्ये, दोन PS-4 गेमिंग कन्सोलच्या मदरबोर्डच्या खाली, सामान वाहून नेणाऱ्या हातगाडीच्या पुढील चाकाजवळ आणि शरीरावर लपवून ठेवलेल्या अवस्थेत होता.

एअर इंडिया एक्स्प्रेस IX-252 आणि IX-296 या विमानांच्या सीमाशुल्क तपासणी दरम्यान, 4140.000 ग्रॅम एकूण निव्वळ वजनाची, 2,70,47,655 रुपये किंमतीची, मेणातील 24 कॅरट सोन्याची पूड (05 पुड्या) सापडली. हा ऐवज, विमानातील आसनांच्या पोकळ नळकांड्यांमध्ये आणि आसनांच्या खाली असलेल्या कप्प्यांमध्ये लपवून ठेवलेला आढळून आला.

सिंगापूर, अबुधाबी आणि बँकॉक येथे जाणाऱ्या 8 भारतीय नागरिकांना रोखण्यात आले. त्यांच्यापाशी 62500 युरो, 50,000 अमेरिकी डॉलर, 25210 थाई बाथ आणि 97 सिंगापूर डॉलर, असे एकूण 96,41,993 रुपयांचे परकीय चलन सापडले. हे चलन या प्रवाशांनी, चेक इन बॅगेज (विमानात बसताना जवळ न बाळगता येणारे स्वतःचे सामान) मधल्या भांड्यांमध्ये, चपलांच्या तळव्यांखाली आणि पापडाच्या थरांमध्ये लपवले होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे गाव ठरतंय कोबीचे मँचेस्टर… बहुसंख्य शेतकऱ्यांचा कोबी पिकाकडे कल

Next Post

जागतिक वारसा समितीचे प्रतिनिधी आणि सदस्यांनी या जागतिक वारसा स्थळांना दिली भेट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
image004J82V

जागतिक वारसा समितीचे प्रतिनिधी आणि सदस्यांनी या जागतिक वारसा स्थळांना दिली भेट

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011