निलेश गौतम, सटाणा
डांगसौंदाणे- भाजीपाला पिकामधील अत्यंत जोखमीचे पीक म्हणून ओळख असलेल कोबी पिक या वर्षी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे .
मेहनत आणि अतिशय सुक्ष्म निरीक्षण ज्याच्याकडे असेल आणि मेहनत घेण्याची मानसिकता असेल अश्याच शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करावी असच काहीसे हे पीक आहे अवघे दोन महिन्यांत येणारे हे पीक निसर्गाच्या सर्वच समस्याना तोंड देत मार्केट मध्ये आणावे लागते. एरवी उन्हाळ्याच्या शेवटी लागवड करीत पावसाळ्यात जून जुलै मध्ये प्रमुख्याने हे पीक मोठ्या प्रमाणावर येते. भाजीपाला पीक म्हणून रोजची मागणी आणि या दिवसात या भागातील कोबीला असलेली प्रचंड मागणी शेतकऱ्याला दोन पैसे मिळवून देते, गुजरात, दिल्ली, आग्रा, इंदोर, कोलकाता आणि देशातील अन्य शहरात हा माल पाठविला जातो. या ठिकाणी स्थानिक एजंट हाताशी धरून परराज्यातील अनेक व्यापारी या ठिकाणी दोन ते तीन महिने स्थान मांडत शेतकऱ्यांच्या मालाचा शेतातच सौदा करीत खरेदी करत देशांतर्गत असलेल्या बड्या शहरात हा माल पाठवितात या मध्ये शेतकऱ्याला दोन पैसे जागेवर मिळण्यासह काढण्याचा व विक्रीचा व मार्केट वारीचा चक्कर वाचतो. या पुर्वी या भागातील कोबीला अहमदाबाद मार्केट मध्ये सर्वाधिक पसंती असल्याने शेतकरी अहमदाबादच्या सरदार पटेल मार्केट मध्ये कोबीची विक्री करत असत. मात्र वेळ व ट्रान्सपोर्ट याचा समतोल साधत जागेवर दोन पैसे मिळत असल्याने आता बहुतांश शेतकरी जागेवर माल विक्रीस पसंती देत असल्याने व्यापारी संख्येत ही मोठी वाढ झाली आहे. या मुळे या भागातील केंद्रस्थानी असलेले बागलणात तालुक्यातील डांगसौंदाणे हे मुख्य कोबीचे मुख्य आगार बनले असून येथील केळझर फाट्यावर रोजच मोठ्या संख्येने मोठी ट्रक लोड होऊन देशभरातील प्रमुख बाजारपेठ मध्ये हा माल पाठविला जात आहे. या मुळे स्थानिक बाजारपेठेला ही सुगीचे दिवस आले असुन रोजची वर्दळ छोट्या मोठ्या व्यवसायिकांसाठी फायद्याची ठरत आहे. तर शेतकरी वर्गासाठी ही कोबी खरेदी व्यापाऱ्यांची वाढलेली संख्या फायद्याची ठरते आहे व्यापारी स्पर्धेमुळें शेतकऱ्यांना ही आपल्या मालाला दोन पैसे मिळतात.
कोबी पीक आणि मेहनत
साधारण कोबीचे 20 ग्राम बियाणे हे 400 ते 500 रुपयाला एक पाऊच मिळते तर नर्सरी मध्ये 80 पैसे ते 1 रुपयांपर्यंत एक रोप मिळते एकरी लागवडी साठी 40 पाऊच किंवा 8 ते 10 हजार रोपे लागतात सरी पद्धतीने लागवड केल्यानंतर या पिकाला पाणी मोठ्या प्रमाणावर लागते या मुळे उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्याकडे मुबलक पाणी आहे तेच या पिकाची लागवड करतात 60 ते 70 दिवसात परिपक्व होणारे हे पीक या काळात शेतकऱ्याला विविध जैविक, आणि रासायनिक फवारणी द्वारे यशस्वी करावे लागते
कोबी पिकाचे करावे लागते या प्रमुक रोगां पासून संरक्षण*..
सुरवातीला लागवडी नंतर 15 दिवसानंतर काठ करपा, तर 45 दिवसानंतर डावण्या, सडवा, या पासून वाचवावे लागते तर लष्करी अळी, साधी अळी, पाकोळी या पासुन ही मोठा धोका असल्याने मोठ्या प्रमाणावर रासायनिक आणि जैविक पद्धतीने फवारणी करत हे पीक सुरक्षित काढावे लागते .
विक्री आणि भाव
भाजीपाला पीक असल्याने कायमच भाव बद्दल अनिश्चितता तरी ही शेतकरी मोठ्या हिमतीने हे पीक लावतो कधी कधी लाखो रुपये खर्च करून कवडीमोल दरात ही हे पीक विकावे लागते शाश्वत बाजार नसल्याने अनेक शेतकरी हे पीक घेणे ही टाळतात मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च आणि बाजार भाव यावर निर्धारित न राहणारे शेतकरी हिम्मत करतात कधी कधी दोन पैसे मिळाल्याने फायदा होतो, या वर्षी कोबी पिकाला सुगीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गात मोठे समाधान आहे
25 ते 30 रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे.
कसे ठरते आहे डांगसौंदाणे कोबीसाठी केंद्रबिंदू
पश्चिम भागातील, बहुसंख्य गावांची व्यापारी दृष्टीने डांगसौंदाणे ही मुख्य बाजारपेठ आहे, या ठिकाणी व्यवसायास मुबलक लागणारी व्यवस्था असल्याने या ठिकाणी हा व्यवहार मोठ्या प्रमाणांत होऊ लागला आहे यासाठी लागणार भुईकाटा, इंधन साठी पेट्रोल पंप, व अन्य गोष्टी उपलब्ध असल्याने शेतकरी कडून खरेदी केलेला माल या ठिकाणी ट्रॅक्टर द्वारे आणत या ठिकाणी मोठे ट्रक, कंटेनर लोड केले जातात