इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने श्रीलंका दौ-यातील टी २० मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयाने सुरुवात केली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने हा विजय मिळवला. भारतीय संघाने श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला संघ १९.२ ओव्हरमध्ये आऊट झाला. त्याल १७० धावांवर रोखण्यात आले. ४३ धावांनी हा सामना भारतयी संघाने जिंकला.
श्रीलंकेच्या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली होती. पण, नंतर भारतीय संघाने जोरदार मुसंडी मारत हा सामना जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाकडून सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या चौघांनी सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने सर्वाधिक ५८ रन्स केल्या. ऋषभ पंतने ४९ धावांचं योगदान दिलं. तर यशस्वी जयस्वाल-शुबमन गिल या दोघांनी अनुक्रमे ४० आणि ३४ धावा केल्या. हार्दिक पंड्याने ९ धावा केल्या. तर अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह ही जोडी अनुक्रमे १० आणि १ धाव करुन नाबाद परतले. श्रीलंकेकडून मथीशा पथीराणा याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर वानिंदु हसरंगा, असिथा फर्नांडो आणि दिलशान मधुशंका या त्रिकुटाने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.