नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सह्याद्री हॉस्पिटलच्या बाजूला विद्युत वहिनीवर मुळासकट झाड कोसळल्यामुळे उच्चदावाहिनीचे तारा तुटल्याची घटना शुक्रवारी घडली. यामुळे काही काळ विद्युत पुरवठा बंद पडला. त्यानंतर तुटलेला वाहिनीचा भाग बंद ठेवून इतर उच्चदाब वाहिनी सुरू करण्यात आली. या वाहिनी दुरुस्तीचे काम महावितरण मधील कर्मचारी, अभियंते यांनी रात्री उशीरापर्यंत केले.
या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या भागात पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. त्यात शुक्रवारी ही घटना घडली.