निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरु असल्याने भावली धरण शंभर टक्के भरले तर दारणा धरण ७८ टक्के, गंगापूर धरण ४५ टक्के भरले आहे.
भावली आणि दारणा धरणातून पूर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पानलाट क्षेत्रात हे पाणी दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या दिशेने गोदावरी नदीपात्रातून १० हजार १३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. या ठिकाणी सेल्फी व रील काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतांना दिसत आहे. या रोखण्यासाठी याठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते.