नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर येथे हॅाटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी दोन लाखाची लाच मागून तडजोडीअंत दीड लाख रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस शिपाई संदीप चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या हॅाटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंग मध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणुन गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
लाच मागणी सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष, वय- 33 वर्ष.
आलोसे- १) श्री संदीप चव्हाण पोलीस नाईक तत्कालीन नेमणूक- स्थानीक गुन्हे शाखा, अहमदनगर
सध्या नेमणूक दहशतवाद विरोधी पथक अहमदनगर
*लाचेची मागणी- 2,00,000/-
तडजोडीअंती 1,50,000/- रुपये
हस्तगत रक्कम- निरंक
*लाचेची मागणी दिनांक – दि. 22/ 03/2024
*लाच स्विकारली – निरंक
- तक्रार:- यातील तक्रारदार यांच्या हॅाटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंग मध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्याकरिता व भावाला ताब्यात घेतलेले असल्याने त्यांना सोडून देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 2,00,000/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1,50,000/- रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणुन गुन्हा.
- आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर
*हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे. *सापळा अधिकारी*
*श्रीमती गायत्री मधुकर जाधव तत्कालीन पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नाशिक मोबा.नं. 7588516042
*दाखल करणारे अधिकारी: मीरा कौतिका वसंतराव आदमाने पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. नाशिक
तपासी अधिकारी – श्री. प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर
सापळा पथक
पोहवा/संदिप वणवे
मपोहवा/ ज्योती शार्दुल
चालक पोना/ परशराम जाधव