इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – दिवाळी दरम्यान एसटीने ८ नोव्हेंबर तें २७ नोव्हेंबर पर्यंत तिकीटदरात १० टक्के भाडेवाढ केली असून त्याचे परिपत्रकही प्रसिध्द केले आहे.
प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी अगोदर एसटी महामंडळाने सर्वच मार्गावर बसफेर्या वाढविण्याचे नियोजन केले. त्यानंतर प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली.
प्रासंगिक भाडेवाढ अंतर्गत एसटीच्या तिकीट दरात दरवर्षी ही वाढ केली जाते. दिवाळी दरम्यान बाहेरगावी जाणारे प्रवासी सर्वाधिक असतात. भाऊबीजेच्या दिवशी एसटीतून प्रवास करण्यासाठी जागा सुध्दा मिळत नाही. दिवाळीनंतर आठ दिवसपर्यंत एसटीत गर्दी राहात असल्याने एसटी महामंडळ ही भाडेवाढ करत असते.
या भाडेवाढीबरोबरच दिवाळीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षी बस फेर्या वाढविण्यात येतात त्या यावर्षीही वाढवण्यात आल्या आहे. गरजेनुसार प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन वेगवेगळ्या मार्गावर बस फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बघा ही दरवाढ