इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वरळीतील भल्या पहाटे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी शिंदे गटातील उपनेत्याला ताब्यात घेतले आहे. पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली होती. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती जखमी झाला. ही कार शिंदे सेनेच्या उपनेता राजेश शहा यांची असून ती मुलगा मिहिर शाहा चालवत होता.
दुचाकीवरील दाम्पत्याला धडक दिल्यानंतर महिलेला फरफटत नेण्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दुचाकीला कारची मागून धडक बसली. त्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन कारसह फरार झाले होते. मुलगा आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिहीर शाह कार चालवत होता. मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे ५:३० वा चार या चाकीने फरफटत नेले. वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ ही घटना घडली.