इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजी नगरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे १८ पदाधिकारी शिवसेनेत सामील होणार आहे. आज येथे शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह १८ जण हा प्रवेश करणार आहे. त्यात भाजपचे ७-८ माजी नगरसेवक, १ जिल्हा परिषद सदस्य, दोन पंचायत समिती सदस्य, १ तालुका अध्यक्ष, १ युवा मोर्चा अध्यक्ष, ५ मंडळ अध्यक्ष यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
या प्रवेशामुळे मंत्री अतुल सावे यांना हा मोठा धक्का आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांची अडचण वाढणार आहे. यातील माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवलेली आहे.