बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोबाईल सेवा दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रालयाने दिले हे स्पष्टीकरण…

by India Darpan
जुलै 7, 2024 | 12:58 am
in संमिश्र वार्ता
0
MOBILE

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशात सद्यस्थितीतील मोबाईल सेवा बाजारपेठेत सेवांचा पुरवठा हा खाजगी क्षेत्रातील तीन कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीद्वारे होत असून, ही संपूर्ण बाजारपेठ मागणी आणि पुरवठा याच महत्त्वाच्या तत्वांवर चालत असल्याचे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले.
ग्राहकांच्या हितांचे रक्षण करणे, अद्ययावत तंत्रज्ञानातील गुंतवणुकीसह आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित करत, नियोजनबद्ध विकासाला चालना देणे यावरच सरकारचा भर असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

  1. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India – TRAI) कायदा 1997 मधील तरतुदींनुसार नुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही देशातील दूरसंचार सेवांसाठी स्थापित स्वतंत्र नियामक संस्था असून, ही संस्था देशभरातील दूरसंचार सेवांच्या दरांचे नियमन करते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने गेल्या दोन दशकांपासून मोबाईल सेवांचे दर नियंत्रणात ठेवले आहेत. भारत सरकारची धोरणे आणि त्याचवेळी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दरांसाठी अधिसूचित केलेले नियमन धोरण यामुळे देशातील मोबाईल सेवा ग्राहकांना सर्वात स्वत दरात या सेवा उपलब्ध होऊ शकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने (International Telecommunication Union – ITU) मोबाईलद्वारे उपलब्ध होणाऱ्या दूरसंचार सेवांअंतर्गत प्रत्यक्ष फोन कॉल आणि डेटा सुविधांसाठी 140 मिनिटे + 70 लघु संदेश सेवा (SMS) + 2 जीबी इंटरनेट डेटा अशा किमान सेवा – सुविधांचा संच आखून दिला आहे. याच संचासाठी आपल्या काही शेजारी तसेच प्रगत देशांमध्ये आकारल्या जाणाऱ्या दरांविषयी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने 2023 ने प्रकाशित केलेली आहे.
  2. मोबाईल सेवा पुरवठ्याच्या परवान्याकरता सेवा – शुल्काशी संबंधित अटी खाली दिल्या आहेत:
    परवानाधारकांनी त्यांच्याद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा – सुविधांचे दर हे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेले दरविषयक आदेश / नियमन धोरण / निर्देश / निर्णयानुसारच आकारले पाहिजेत. परवानाधारकांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा, 1997 मधील तरतुदींनुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेले आदेश/ नियमन धोरण / निर्देशांमधील सूचना आणि आदेशांप्रमाणे आपले दरपत्रक आणि अधिसूचना प्रकाशित करणे तसेच आपल्या बाजूने माहिती प्रकाशित करण्याच्या तरतुदींचे पालन केले पाहिजे.
  3. भारतात, सध्या, खाजगी क्षेत्रातील तीन परवानाधारक आणि सार्वजनिक क्षेत्रातील एका परवानाधारकांद्वारे मोबाईल सेवा वितरित केल्या जात आहेत. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, ही मोबाईल सेवांसाठी सर्वात अनुकूल बाजार रचना आहे.
  4. दूरसंचार सेवांचे दर स्वतंत्र नियामकाने म्हणजेच ट्राय ने अधिसूचित केलेल्या नियामक चौकटीत, बाजारातील शक्तींद्वारे ठरवले जातात. सरकार मुक्त बाजाराच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत नाही कारण ते ट्रायच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत आहेत आणि दर व्यवहार्य आहेत. मोबाईल सेवांच्या दरातील कोणताही बदल दूरसंचार सेवा प्रदाता (TSPs) द्वारे ट्राय ला सूचित केले जातात. आणि असे बदल विहित नियामक चौकटीत आहेत की नाही याचे निरीक्षण ट्राय कडून केले जाते. येथे नमूद करणे उचित आहे की दूरसंचार सेवा प्रदात्याने 2 वर्षांहून अधिक काळानंतर मोबाईल सेवांच्या किमती वाढवल्या आहेत. गेल्या 2 वर्षांत, काही दूरसंचार सेवा प्रदात्यांनी देशभरात 5G सेवा सुरू करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे 100 Mbps या मोबाईलच्या सुरवातीच्या स्पीडमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि भारत आंतरराष्ट्रीय क्रमवारीमध्ये ऑक्टोबर 2022 मधील 111 स्थानावरून आज 15 व्या क्रमांकावर झेपावला आहे.
  5. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करताना, दूरसंचार क्षेत्राच्या सुव्यवस्थित वाढीसाठी, ज्यात 5G, 6G, IoT/M2M for Industry 4.0 इत्यादी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे समाविष्ट आहे, अशा क्षेत्राची आर्थिक व्यवहार्यता महत्त्वाची आहे.
  6. मागील 10 वर्षापूर्वी, दूरसंचार क्षेत्र वादात अडकले होते, या क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव होता आणि त्यामुळे मोबाईल सेवांची वाढ खुंटली होती. गेल्या 10 वर्षांत, सरकारच्या प्रगतीशील धोरणांमुळे, दूरसंचार सेवांचे दर मग ते व्हॉईस असो किंवा डेटा, झपाट्याने घसरले आहेत. सरकारला स्पेक्ट्रम लिलावातून मोठ्या प्रमाणात बिगर-कर महसुलाचा लाभ मिळाला आहे जो पूर्णपणे पारदर्शक आणि कार्यक्षम आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाकिट बंद खाद्यपदार्थांच्या लेबलवर आता हे ठळक अक्षरात प्रदर्शित करावे लागणार….

Next Post

सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळली…सात जण ठार

India Darpan

Next Post
Untitled 26

सुरतमध्ये सहा मजली इमारत कोसळली…सात जण ठार

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011