इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळ(एनबीइएमएस) या स्वायत्त मंडळाने आज 35,819 उमेदवारांसाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) घेतली.
ही परीक्षा 21 राज्यांतील 50 शहरांमधील 71 केंद्रांमध्ये घेण्यात आली. कठोर परीक्षेच्या सुरक्षा उपायांच्या दिशेने एक पाऊल म्हणून एनबीइएमएसने या परीक्षेचे आयोजन करण्यासाठी 250 हून अधिक परीक्षकांची नियुक्ती केली. याशिवाय 45 सदस्यांच्या भरारी पथकाने या उपायांना आणखी बळकटी दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशानुसार, आरोग्य सेवा महासंचालक (डीजीएचएस), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इतर संस्थांनी देखील सर्व परीक्षा केंद्रांवर वरिष्ठ पर्यवेक्षकांची नियुक्ती केली होती. कोणत्याही ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही आणि एनबीएएमएस आजच्या या परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेचा निकाल लवकरच घोषित करेल.