इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे. ज्यामध्ये नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. संसदेचे हे अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
याअगोदर १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आता नवे सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.
याबाबत संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, राष्ट्रपतींच्या शिफारशीनुसार, २२ जुलै, २०२४ ते १२ ऑगस्ट, २०२४ (संसदीय कामकाजाच्या अत्यावश्यकतेच्या अधीन) अर्थसंकल्पीय अधिवेशन, २०२४ साठी संसदेच्या दोन्ही सभागृहांना बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प, २०२४-२५ लोकसभेत २३ जुलै २०२४ रोजी सादर केला जाईल.