रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

विधिमंडळात पहिल्यांदाच, विश्वविजेत्यांचा सन्मान..! अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर

जुलै 5, 2024 | 8:51 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 22

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी टी-२० विश्वचषक क्रिकेट २०२४ विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा मुंबईकर कर्णधार रोहित शर्मा तसेच त्याचे संघातील सहकारी सुर्यकूमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे, संघ व्यवस्थापक अरूण कानडे यांचा आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, पुष्पगुच्छ, विशेष मानचिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय संघासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने अकरा कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले.

विधानभवनात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या विशेष समारंभास विधानसभा अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आमदार ऍड.आशिष शेलार, दोन्ही विधिमंडळातील सदस्य, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजयश्री खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली असल्याचे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी मुंबई महानगर प्रदेशात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम उभारण्यास गती देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस बांधवांचे विशेष अभिनंदन
विशेष म्हणजे, काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतावेळी जो प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्यावेळी गर्दीचे योग्य नियोजन केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. इतक्या मोठ्या गर्दीला नियंत्रण करणे हे मोठे आव्हान होते, तरीही मुंबई पोलिसांनी योग्य नियोजन करीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू दिली नाही हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्याबद्दल यावेळी मुंबईचे आयुक्त विवेक फणसाळकर आणि सर्व पोलीस बांधवांचे विशेष अभिनंदन केले.

यावेळी बोलताना, भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे. हे आपल्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. पराभवाच्या छायेतून विजयश्री खेचून आणून, कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावी अशी कामगिरी केली असल्याचे सांगत त्यांच्या पाठीवर… https://t.co/sDqO1EObBc pic.twitter.com/EUCm9Ojsys

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विधानपरिषदेत लक्षवेधी…मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलणार

Next Post

या व्यक्तींनी बाहेरील प्रवास टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ६ जुलैचे राशिभविष्य

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

indian army e1750762947859
महत्त्वाच्या बातम्या

सुवर्णसंधी! भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? येथे मिळेल मोफत प्रशिक्षण…

ऑक्टोबर 19, 2025
messi
महत्त्वाच्या बातम्या

स्वप्न सत्यात येणार… फुटबॉल सम्राट मेस्सीसोबत खेळण्याची सुवर्णसंधी… युवा फुटबॉलपटूंनो फक्त हे करा…

ऑक्टोबर 19, 2025
1002689727
मुख्य बातमी

निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तरं देतायेत? राज ठाकरे कडाडले

ऑक्टोबर 19, 2025
Untitled 79
महत्त्वाच्या बातम्या

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व… अशी करा पूजा…

ऑक्टोबर 19, 2025
narak chaturdashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे नरक चतुर्दशी – असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 19, 2025
IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बाहेरील प्रवास टाळावे, जाणून घ्या, शनिवार, ६ जुलैचे राशिभविष्य

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011