नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला येथील प्रशासकीय संकुलात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच वेळी दोन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय कामाचे बिल काढण्यासाठी पंचायत समितीचे बीडीओ मछिंद्र धस यांनी शासकीय कर्मचाऱ्याकडे चेकवर सही करण्यासाठी २० हजाराची लाच मागितली तर प्रांत अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन राहतळ यांना शासकीय कामाचा दाखला देण्याच्या कामी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एकाच वेळी येवला प्रशासकीय संकुलात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
यशस्वी सापळा कारवाई*
▶️ युनिट – नाशिक
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 37 वर्ष
▶️ *आलोसे- श्री जनार्दन भानुदास रहाटळ, वय-55 वर्ष, पद- अव्वल कारकून वर्ग 3 , नेमणूक उप विभागीय अधिकारी कार्यालय येवला तालुका येवला जिल्हा नाशिक
▶️ लाचेची मागणी- दि.03/07/2024 1100/- रु.
▶️* तडजोड अंती- 700/- रु.
▶️* लाच स्वीकारली* दि.05/07/2024 700/- रू
▶️ लाचेचे कारण- यातील तक्रारदार यांचे चुलत चुलते यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे भूसंपादनाचा ना हरकत दाखला मिळणे कामे अर्ज सादर केला होता सदर दाखला देण्याच्या मोबदल्यात आरोपी लोकसेवक यांनी दिनांक 03/07/2024 रोजी 1100/ रुपयाची मागणी करून सदर दिवशी भेटीदरम्यान शंभर रुपये स्वीकारून उर्वरित 1000/ रुपये लाचेची मागणी केली
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याकारणाने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याशी संपर्क साधला असता पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी तडजोडी अंती 700/ रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले सदर लाचेची रक्कम 700/- रुपये आज दिनांक 05/07/2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध येवला शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*▶️ * सापळा अधिकारी**
श्रीमती मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक*
मो. न. 9921252549
▶️ सापळा पथक
1)पो हवा पंकज शामराव पळशीकर
2) पो ना प्रमोद प्रमिला रत्नाकर चव्हाणके
3) चालक पोलीस नाईक परशराम रमेश जाधव
…………………………………………….
यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट –नाशिक*
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 37 वर्ष
▶️ आलोसे- मच्छिंद्र नाथ देवव्रत धस
गटविकास अधिकारी येवला.वर्ग* -1
पत्ता – विठ्ठल नगर, येवला.
राहणार . अहमदनगर.
▶️ लाचेची मागणी-
20000/- रुपये दिनांक-03/07/2024 रोजी
▶️ लाच स्विकारली-
20000/ रुपये
दिनांक-05/07/2024 रोजी
▶️ हस्तगत रक्कम-
20000/-रुपये
▶️ लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत 2022- 2023 करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायततील वस्ती वर ठेकेदार मार्फत झालेले विकास कामाचे बिल मंजूर करण्यासाठी चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाचे 2 टक्के या प्रमाणे 20,000 हजार रुपयाची पंच समक्ष लाचेची मागणी करून दिनांक 5/7/2024 रोजी स्वीकारली असता त्यांना पंचसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांचे विरुद्ध येवला सिटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी
श्री.निलिमा केशव डोळस
पोलीस निरीक्षक
ला..प्र.वि. नाशिक मोबा.8108065888
▶️ सापळा पथक
पो. ह . गांगुर्डे चालक
पोलिस नाईक संदीप हांडगे.
पोलिस शिपाई सुरेश चव्हाण.