मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडींच्या आमदारांनी वाढत्या महागाईविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आज ७ वा दिवस आहे. या सातही दिवशी विरोधकांनी वेगवेगळे विषय घेत आंदोलन केले. आज त्यांनी महागाईकडे सरकारचे लक्ष वेधले.
आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी महागाई नियंत्रणात न ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…महागाई हाय हाय, राज्य सरकार हाय हाय
अशी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडींच्या आमदारांनी वाढत्या महागाईविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केलेले हे आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले.