नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सप्तशृंग गडावरील वन विभागाच्या हद्दीत सादड्याच्या झाडाला एका ३६ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मनोज जगदाळे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील रहिवाशी आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी कळवण पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहे.