इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः मुकेश अंबानी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाचे आमंत्रण सोनिया गांधी यांना दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आणि ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोनिया यांची त्यांच्या १० जनपथ निवासस्थानी भेट घेतली. अंबानी त्यांचा मुलगा अनंत याच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन गेले होते. सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे १२ जुलैला लग्न आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये हा लग्न सोहळा होणार आहे.
बुधवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याचा एक भाग म्हणून एक ममरू सोहळा झाला. त्यात संपूर्ण अंबानी कुटुंब सहभागी झाले होते. त्यांच्या लग्नाआधीच्या दोन सोहळ्यांना देश-विदेशातील बड्या सेलिब्रिटी आणि उद्योगपतींनी हजेरी लावली. आता लग्नसोहळयासाठी मुकेश स्वतः खास पाहुण्यांना आमंत्रित करीत आहेत.