गुरूवार, ऑक्टोबर 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक येथील तोफखाना केंद्रातील कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे उदघाटन…ही आहे ठळक वैशिष्ट्ये

जुलै 2, 2024 | 2:14 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240701 WA0320 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय लष्कराच्या नाशिक येथील तोफखाना केंद्रातील नूतनीकरण केलेल्या कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे आज उदघाटन झाले. देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या जयंतीनिमीत्त आज या नुतनीकरण झालेल्या तोफखाना संग्रहालयाचा भव्य उद्घाटन समारंभ झाला. कुमारमंगलम तोफखाना संग्रहालय असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांचे पुत्र सुबरायण बेहराम आणि त्यांची कन्या पार्वती या उद्घाटन समारंभाला उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच स्कुल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट आणि रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वरिष्ठ कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर (अतिविशिष्ट सेवा पदक**), आर्टिलरी महासंचालक आणि ग्रूप – VI चे कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल अदोष कुमार (अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक) यांच्यासह माजी सैनिक तसेच इतर मान्यवरही या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावे साकारण्यात आलेले तोफखाना संग्रहालय हे देशातील अशाप्रकारचे एकमेवद्वितीय संग्रहालय आहे. या सग्रहालयाच्या माध्यमातून देशाच्या तोफखान्याचा समृद्ध इतिहास आणि तोफखान्याचे महत्त्वपूर्ण योगदानाचे मूर्त स्वरुप नागरिकांसमोर मांडण्यात आले आहे. त्यामुळेच नाशिकला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक प्रमुख ठिकाण ठरणार आहे.

१६ नोव्हेंबर १९६८ रोजी जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांनी स्वतः या संग्रहालयाची पायाभरणी केली होती, त्यानंतर २७ सप्टेंबर १९७० रोजी लेफ्टनंट या संग्रहालयाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासूनच या संग्रहालयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. गेल्या काही काळात, पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने जतन संवर्धनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करत तसेच हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांना अनुसरून या संग्रहालाचे अनेकदा नूतनीकरण केले गेले आहे.

या संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून बाहेर सामाजासोबत जोडले जाण्याच्या उद्देशाने संग्रहालयाच्या आवारात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट्स साकारण्यात आले आहेत. या सेल्फी पॉईंट्समुळे संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचा या भेटीचा अनुभव टिपण्याची आणि तो इतरांसोबत सामायिक करण्याची संधी मिळणार आहे. या संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच उमराव सिंग, (व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त ) यांच्या पहिल्या महायुद्धातील ऐतिहासिक पराक्रमांच्या, तसेच बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळच्या प्रसिद्ध टांगेल हवाई हल्ल्याचे प्रेरणादायी चित्रण प्रदर्शन स्वरुपात साकारण्यात आले आहे.

या संग्रहालयातील तोफांच्या आजवरच्या वाटचालीचे दर्शन घडवणारे प्रदर्शनगृह हे या संग्रहालयाचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रदर्शनगृहात ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपासून ते आजच्या समकालीन काळापर्यंत रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या तोफखान्यांमध्ये झालेली प्रगती आणि बदलांचे दर्शन होते. या संग्रहालयात पर्यटकांना इतिहासाचा समृद्ध अनुभव देणारे, पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धासारख्या मोठ्या युद्धांमधील शौर्य आणि बलिदानाच्या गाथांना समर्पित स्वतंत्र प्रदर्शनगृही देखील साकारण्यात आले आहे. सियाचिन सारख्या खडतर हिम प्रदेशातील दहशतवादविरोधी मोहिमा, क्रीडा क्षेत्र तसेच विविध मोहिमा आणि कार्यान्वयातील गनर्स (Gunners) अर्थात तोफखाना विभागाच्या दारुगोळा हाताळणाऱ्या / शस्त्रधारी जवानांचे योगदान आपल्यासमोर मांडणारी प्रदर्शनगृहे देखील या संग्रहालयात साकारण्यात आली आहेत.

देशाची सेवा केलेल्या गनर्स जवानांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी, आणि त्यांचे बलिदान कधीही विस्मृतीत जाणार नाही याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने, या संग्रहालयात एक रोल ऑफ ऑनर साकारण्यात आले आहे. मुख्य संग्रहालयाबाहेरच्या प्रांगणातही तोफखान्याचे असंख्य भाग मांडले आहेत. इथे पर्यटकांसाठी गुंतवून ठेवणारा लाइट अँड साऊंड शो देखील असून, या शोच्या वेळी तोफखान्याचे हे भाग प्रत्यक्षात कार्यरत असल्याचा जिवंत अनुभव पर्यटकांना येतो.

कारगिल युद्धावरील थ्रीडी चित्रपट हे या संग्रहालयातील उपक्रमांमधले पर्यटकांसाठीचे प्रमुख आकर्षण आहे. या चित्रपटातून पर्यटकांना खडतर प्रदेशात सशस्त्र दलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या आव्हानांचा आणि अशा प्रदेशांसोबत जुळवून घेताना या जवानांना दाखवाव्या लागणाऱ्या लवचिकतेचा समृद्ध आणि तितकाच चित्तथरारक अनुभव घेण्याची संधी मिळते.

भारतीय लष्कराच्या वतीने कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे दरवाजे जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत, आणि हे संग्रहालय म्हणजे केवळ कलाकृतींचे भांडार नाही, तर ते गनर्स अर्थात आपल्या तोफखाना विभागाच्या दारुगोळा हाताळणाऱ्या / शस्त्रधारी जवानाचे साहस आणि समर्पण भावनेचा जिवंत पुरावा आहे, अशा शब्दांत तोफखान्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अदोष कुमार ( अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक) यांनी उद्घाटनानंतर केलेल्या संबोधनातून आपल्या भावना व्यक्त केल्या. या संग्रहालयाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा देणे आणि देशाच्या रक्षणासाठी केलेल्या बलिदानाविषयीचा आदर तळागाळापर्यंत रुजवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

कुमारमंगलम तोफखाना संग्रहालय म्हणजे, भारतीय तोफखान्याच्या गौरवशाली इतिहासाची आणि शौर्याच्या इत्यंभूत माहितीचा अनुभव देणारे संग्रहालय आहे, आणि म्हणूनच ते लष्कराविषयी आत्मियता बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तिसाठी, तसेच नाशिकला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी आवर्जून भेट द्यावे असे गौरवशाली ठिकाण ठरले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीएससी सेंटर जर विम्यासाठी शेतकऱ्यांकडून १ रुपया पेक्षा जास्त रक्कम घेत असेल तर या ठिकाणी करा तक्रार

Next Post

चैनस्नॅचरांचा धुमाकूळ…सिडकोत वेगवेगळय़ा दोन घटनेत चोरट्यांनी ५७ हजाराचे दागिने केले लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
crime 1111

चैनस्नॅचरांचा धुमाकूळ…सिडकोत वेगवेगळय़ा दोन घटनेत चोरट्यांनी ५७ हजाराचे दागिने केले लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011