इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या डॉ. प्रज्ञा या पत्नी आहेत. काँग्रेसकडून अनेक जण इच्छुक होते. पण, काँग्रेसने सातव यांना संधी दिली. उद्या या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करायचे असल्यामुळे काँग्रेसने आज उमेदवारी जाही केली.
राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या एका उमेदवारासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ५ जागा भाजप, २ शिंदेसेना तर २ जागा अजित पवार यांची राष्ट्रवादी लढवणार आहे. तर महाविकास आघाडीला दोन किंवा तीन जागा लढण्याची शक्यता आहे.
भाजपचे हे उमेदवार जाहीर
भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठीची पाच नावे जाहीर केली असून त्यात पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी दिली आहे. एक परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने १० नावांची यादी पाठवली होती. पण, त्यात या पाज जणांना संधी मिळाली आहे.