नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र शासनाच्या वतीने राज्यांच्या सीमेवरील चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही अनेक राज्यांच्या सीमेवर चेक पोस्ट सुरू आहे. हे चेक पोस्ट बंद करण्यात यावे यासाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस च्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराला मोठा यश मिळालं असून मध्य प्रदेश सरकारने दि.१ जुलै २०२४ पासून आपले बॉर्डर वरील चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने ई वे बिल सुविधा सुरू करण्यात आल्यानंतर राज्याच्या बॉर्डरवरील चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आला. मात्र तरी देखील अनेक राज्यांच्या बॉर्डर वरील चेक पोस्ट सुरू होते. या चेक पोस्टच्या माध्यमातून चालकांची मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने लूट करण्यात येत होती. यावर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाकडे ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून मध्य प्रदेश सरकारने दि.१ जुलै २०२४ पासून चेक पोस्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे मध्य प्रदेश सरकार आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष अमृतलाल मदान, चेअरमन डॉ. जि.आर.शांमूगप्पा, मलकित सिंग बल यांचे आभार मानले आहे.