नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई केलेली असतांना विना परवानगी शहरात कोयता घेऊन फिरणा-या तडिपारावर पोलीसांनी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हद्दपारी आदेशाचे उल्लंघन व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहूल उर्फ सनी शाम भाटीया (२७ रा. नाशिकरोड ) असे संशयित कोयताधारी तडिपाराचे नाव आहे. सनी भाटीया याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्या विरूध्द सहा महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास तडिपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.२८) तो जियाउद्दीन डेपो ते पवारवाडी दरम्यानच्या बारी इंजिनिअरींग वर्क्स नावाच्या दुकानासमोर मिळून आला. त्याच्या अंगझडतीत लोखंडी धारदार कोयता आढळून आला असून याबाबत अंमलदार गोकुळ कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार विष्णू गोसावी करीत आहेत.
…….
महिलेची विषारी औषध सेवन करून आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लॅमरोड भागात राहणा-या ५७ वर्षीय महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वर्षा जितेंद्र पटेल (रा.आनंद आरोग्य निधी,सौभाग्यनगर लॅमरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. वर्षा पटेल यांनी गेल्या शनिवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात रेटॉल नावाचे उंदीर मारण्याचे औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच पती जितेंद्र पाटील यांनी नजीकच्या संतकृपा हॉस्पिटल मार्फत त्यांना वडाळा नाका भागातील सह्याद्री रूग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी उपचार सुरू असतांना डॉ. महेश बनसोडे यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
वाहनांची तोडफोड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहनांची तोडफोड करीत कुटूंबियांनी एका महिलेस विटकर फेकून मारल्याची घटना उपनगर परिसरात घडली. या घटनेत महिलेस दुखापत झाली असून इमारतीच्या पार्किग मधील दुचाकीचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वप्निल पगारे,प्रतिक पगारे व विणा पगारे (रा.तिघे उपनगर) अशी महिलेस मारहाण करणाºया संशयितांची नावे आहेत. याबाबत रिना अविनाश साबळे (२९ रा.करूणा अपा.शांतीपार्क,उपनगर) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित व तक्रारदार जखमी महिला एकाच भागातील रहिवासी असून त्याच्यात वाद आहे. दि.१८ मे रोजी रात्री साबळे या आपल्या इमारतीच्या खाली उभ्या असतांना संशयितांनी त्यांना कुठलेही कारण नसतांना मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. या घटनेत स्वप्निल पगारे याने विटकर फेकून मारल्याने महिला जखमी झाल्या असून या वादानंतर संशयितांनी पार्किंग मध्ये लावेल्या त्यांचया एमएच १५ जेबी ८१०७ या दुचाकीचेही मोठे नुकसान केले आहे. अधिक तपास उफनिरीक्षक पवार करीत आहेत.