इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः युजीसी-नीट परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा १८ जून रोजी घेण्यात आल्याच्या एका दिवसानंतर रद्द करण्यात आली होती. आता ही परीक्षा २१ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
डार्कनेटवर पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द झाल्याच्या आठवडाभरानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे आयोजित सर्व परीक्षा संगणकावर आधारित असेल. एनसीईटीची परीक्षा दहा जुलै रोजी होणार आहे. २५ ते २७ जुलै दरम्यान संयुक्त सीएसआयआर युजीसी नेट घेण्यात येईल. अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा आधीच ठरल्यानुसार सहा जुलै रोजी होणार आहे.
पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. तर संसदेतही हा विषय चांगालच गाजला आहे. त्यात आता या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहे.