इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टी-20 वर्ल्ड कपमधील भारतीय संघ आणि साऊथ आफ्रिकेबरोबर फायनल सामना आज होणार आहे. हा सामना बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन या मैदानावर रंगणार असून त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्यावरही पावसाचे सावट आहे.
या अंतिम सामन्यात भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज या खेळांडूपैकी कोणाला संधी मिळते हे महत्त्वाचे आहे.
हा सामना भारतीय संघ सहज मारेल असा सर्वांचा विश्वास आहे. आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी सरस झाली आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळेल असे सर्वांना वाटत असले तरी दुसरीकडे साऊथ आफ्रिकेला पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे ते यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.