नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरात एकट्या असलेल्या सूनेचा सास-याने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत विवाहीतेने पतीकडे आपबिती कथन केली असता त्यानेही आपल्या वडिलांची बाजू लावून धरत पत्नीस फोनवर शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बापलेकाविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडाळारोड भागात पीडितेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पीडितेचा २०२२ मध्ये विवाह झाला. त्यानंतर ती सासरी नांदत असतांना ही घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत वेळोवेळी सास-याने तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पतीकडे वाच्यता केली असता त्यानेही आपल्या वडिलांची बाजू लावून धरत पत्नीस फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.