मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या पावसाळी अधिवेशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उध्दव ठाकरे एकाच लिफ्टमध्ये प्रवास केला. राज्यात राजकारणातले हे पॅाझिटिव्ह चित्र सर्वांनाच बघायला मिळाले. विधीमंडळाच्या लिफ्टजवळ दोन्ही नेते एकत्र दिसल्यामुळे त्याची राजकीय चर्चाही रंगली.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. त्यानंतरचे हे चित्र सर्वांनाच धक्का देणारे होते. यावेळी लिफ्टमध्ये या दोन्ही नेत्यांबरोबर मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, दरेकर होते. लिफ्टमधून उतरल्यानंतर दोन्ही दोन्ही दिशांना निघून गेले. त्याअगोदर मंत्री चंद्रकांत पाटील यांची उध्दव ठाकरे बरोबर भेट झाली.