मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुतीचे पळपुटे सरकार म्हणत आज महाविकास आघाडीतील सर्व आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ व्हावी या मागण्या करण्यात आल्या.
राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी ही आमची मागणी असल्याचे महाविकास आघीडतर्पे सांगण्यात आले.