माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार आहे. मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात रविवार ३० जूनपर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम जरी असली तरी आता खान्देशातील नंदुरबार धुळे जळगांव अशा तीन जिल्ह्यात तसेच उत्तर नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा कळवण सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यात मात्र आजपासून आठवडाभर म्हणजे गुरुवार ४ जुलै पर्यंत, गुजराथ राज्याच्या पश्चिमेंकडून येणारा अरबी समुद्र शाखीय म्हणजे डांग जिल्ह्याच्या घळीतून येणाऱ्या डांगी पावसाची जोरदार शक्यता मात्र वाढली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या उर्वरित नाशिक, सिन्नर नांदगाव निफाड येवला या ५ तालुक्यात तसेच नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या ६ जिल्ह्यात रविवार दि. ३० जून पर्यन्त मात्र वर्तवलेली मध्यम पावसाचीच शक्यता ही तशीच आहे.
मुंबईसह कोकण व विदर्भात रविवार ३० जूनपर्यंत वर्तवलेली जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. फक्त दरम्यानच्या पाच दिवसात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यापैकी काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता ही तशीच आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.