इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कंगना राणावत सध्या तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाच्या प्रमोशन साठी दिल्लीत आली असुन यावेळी तिने दिल्लीतील इस्त्रायल ॲम्बेसीमध्ये जावून इस्त्रायलचे भारतातील राजदूत नाओर गीलोन यांची भेट घेतली.
कंगनाने केला दहशतवादाचा विरोध
आपल्या खड्या वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेल्या कंगनाने दहशतवादाला आपला तीव्र विरोध असल्याचे सांगत हमासचा उल्लेख ‘ आधुनिक रावण’ असा केला. काल दसऱ्यानिमित्त दिल्लीतील लाल किल्ला येथे झालेल्या ‘ रामलीला’ दरम्यान तिने काल येथे रावण दहन केले होते .
इस्त्रायलच्या विजयाची आशा
या भेटी संदर्भातले फोटो सोशल मीडियावर शेयर करतानाच कंगनाने दहशतवादाला विरोध केला. तसेच निष्पाप लहान मुले व महिलांना निष्कारण लक्ष्य केले जात असल्याचे आपल्या पोस्ट मध्ये तिने म्हंटले आहे. दहशतवादाविरुद्धचा हा लढा इस्त्रायल जिंकणार अशी आशा तिने व्यक्त केली आहे.
नाओर गिलोन यांनीही शेयर केले फोटो
इस्त्रायलचे राजदूत नाओर गीलोन यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर संबंधित भेटीचे फोटो शेअर करुन कंगना व टीमचे त्यांनी दाखविलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले.
‘तेजस’ चे प्रदर्शन
RSVP ची निर्मिती असलेला ‘तेजस’ चित्रपट उद्या म्हणजे २७ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून यात कंगना टायटल रोलमध्ये दिसणार आहे.