नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी इंग्रजीतून शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजीतून शपथ घेऊन त्यांना उत्तर दिले.
लोकसभेत सुजय विखे पाटील यांनी मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करुन जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर चांगलचे पडसाद उमटले होते. त्यानंतर लंकेने यांनी विखे यांचे आव्हान स्विकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड असे ते म्हणाले होते.
या आव्हान, प्रतिआव्हान नंतर निवडणूक संपली. लंके विजयी झाले. पण, संसदेच्या दुस-याच दिवशी लंकेने इंग्रजीत शपथ घेऊन विखे पाटील यांना उत्तर दिले.