नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखाच्या दुकानात गांजा व विमल पुड्या पोलिसांनी रात्री छापा टाकत जप्त केल्या. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मनमाड पोलिस उपअधीक्षक यांच्या पथकाने तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांच्या दुकानातून ८ किलो गांजा व ४० विमल गुटख्याच्या पुड्या जप्त केल्या.
या घटनेची कुठलीही शहानिशा न करता तालूका प्रमुखांवर राजकीय षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करीत आज नांदगाव व मनमाड मध्ये बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान शिवसेना जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली मनमाड येथे शिवसेना पदाधिकारी यांनी शहरातून फेरी काढत घोषणाबाजी केली..