इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशभर परिक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असतांना त्यात उत्तर प्रदेश सुध्दा रडारवर आहे. येथील परीक्षेत होणा-या गोंधळावरुन विरोधक चांगलेच आक्रमक आहे. त्यात आता काँग्रेस नेते व खासदार शशी थरुर यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
थरुर यांनी टाकलेल्या पोस्टमध्ये शानदार परीक्षापे चर्चा असे म्हटले आहे. त्यात त्यांनी एक उत्तर पत्रिकेची इमेज टाकली असून त्यात उत्तर प्रदेश किसे कहते है असा प्रश्न असून त्यात उत्तर म्हणून वह प्रदेश जहा परीक्षा से पहले उत्तर का पता चल जाए उसे उत्तर प्रदेश कहते है…यात १० पैकी १० गुण मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सम्मान लायक हो बेटा असा शेरा त्यात आहे.
खरं तर त्यांनी परीक्षेतील गोंधळावर हा चिमटा काढला असला तरी तो सत्ताधा-यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. प्रश्नपत्रिकेचे उत्तर अगोदर मिळाल्यामुळे परीक्षेत गोंधळ झाला हे वास्तव आहे. पण, त्यावर वेगळ्यापध्दतीने टीका करतांना त्यांनी नेमकं घेरल्यामुळे त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.