बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार का? की लंपडाव करणार? बघा हवामानतज्ञ काय म्हणतात…

by India Darpan
जून 23, 2024 | 5:50 pm
in संमिश्र वार्ता
0
rainfall alert e1681311076829


माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
……
जून शेवटचा आठवडा पावसाचा
१- मान्सून ने आज संपूर्ण महाराष्ट्र काबिज करून सह्याद्री घाटमाथ्यावर काहीं हलकेस्या तीव्रतेने का होईना पण मान्सूनचा वावर जाणवू लागला आहे. त्यामुळे सध्या आजपासुन जूनच्या ह्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे रविवार दि. ३० जून पर्यन्त महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे.परंतु मान्सूनच्या काहीस्या खंडानंतर, महाराष्ट्रात मान्सून चा पाऊस सुरु होणार असल्यामुळे पुन्हा त्याचे स्वरूप, सुरवातीचे काही दिवस हे कदाचित पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखेही असु शकते.

२– विभागवार पावसाची तीव्रता अशी असु शकते?
मुंबईसह संपूर्ण कोकण:- गेल्या पाच दिवसापासून म्हणजे मंगळवार, दि.१८ जूनपासून मुंबईशहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या ह्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही अजुनही कायम टिकून आहे.तर मुंबई शहर, उपनगर, व कोकणात ह्या आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
.
विदर्भ :- गेल्या चार दिवसापासून म्हणजे गुरुवार दि.२० जून पासुन, संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात, पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली आहे.मान्सून बं. उपसागरीय शाखेच्या सक्रियते मुळे आता जूनच्या ह्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात सुद्धा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता ही कायम टिकून आहे.
मध्य महाराष्ट्र :- मान्सून बं. उपसागरीय शाखा सक्रिय झाल्यामुळे मुळे मान्सून अरबी समुद्रीय शाखाही काहीशी उर्जीतावस्थेत आली आहे. त्यामुळे मान्सून साधारण एक किमी. उंचीचा सह्याद्री घाट चढून घाट माथ्यावर वावरतांना जाणवत आहे.त्यामुळे मान्सून खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १० जिल्ह्यात आजपासुन जूनअखेर पर्यंतच्या संपूर्ण आठवड्यात मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता जाणवते.

हे सर्व जरी असले तरी, नाशिक नगर पुणे व छ. सं. नगर अश्या चार जिल्ह्यांच्या काही भागात जून अखेरपर्यंतच्या आठवड्यात, सरासरीपेक्षा, महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेत, पावसाचे प्रमाण, काहीसे, कमी असण्याची शक्यता जाणवते. ह्याचीही शेतकऱ्यांच्या मनी नोंद असावी, असे वाटते.

मराठवाडा :– मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात आजपासुन पुढील चार दिवस म्हणजे बुधवार दि २६ जूनपर्यन्त केवळ मध्यम पावसाचीच शक्यता आहे.गुरुवार दि.२७ ते ३० जूनच्या चार दिवसात मात्र छ.सं.नगर जिल्हा वगळता उर्वरित ७ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू शकतो. वरील ७ पैकी धाराशिव, लातूर अश्या दोन जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तर कदाचित आजपासूनच जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.

३-खरीप पिके व पेरी संबंधी, ह्या पावसाची उपयुक्तता काय असु शकते?
पेर झालेल्या पिकांना जीवदान, तर नापेर ठिकाणी पेर होण्याची, शक्यता ह्या आठवड्यातील पावसाने मिळू शकते, असे वाटते.

४-नजिकच्या काळात ह्यापेक्षा अधिक चांगल्या पावसाची शक्यता कधी असु शकते?
भारत वि्षुववृत्तीय उपसागरीय क्षेत्रात, एमजेओ च्या सक्रियतेमुळे, शनिवार दि. २९ जून ते ६ जुलै दरम्यानच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यता जाणवते.

५-मान्सूनची सक्रियतेची शक्यता कश्यामुळे वाढली?
(i)तीन आठवडे म्हणजे ३१मे पासून एकाच जागेवर खिळलेल्या बंगाल उपसागरीय मान्सूनी शाखेने आपली जागा सोडून काहीशी पुढे झेपावली आहे.
(ii)अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी समोर, समुद्र सपाटीच्या पातळीत तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेंकडून पूर्वेकडे मान्सूनी वारे अधिक बळकट होत आहे.
(iii) राजस्थान व छत्तीसगड वर असलेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती व त्यांना जोडणारा हवेच्या कमी दाबाचा एक तर दुसरा राजस्थान ते ईशान्य अरबी समुद्र जोडणाऱ्या दोन आसामुळे मान्सूनी पावसाला स्थिती पूरक झाली आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कुणबी मुस्लिमांनाही आरक्षणाची जरांगे पाटील यांची मागणी

Next Post

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजने विषयी महावितरणने दिली ही माहिती….

India Darpan

Next Post
mahavitarn

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजने विषयी महावितरणने दिली ही माहिती….

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011